जळगाव प्रतिनिधी । कोट्यवधी रुपये असलेल्या खातेदारांच्या बँक डिटेल्सची चोरी करून ४१२ कोटींवर ऑनलाइन फसवणुकीचा प्लॅन केल्याच्या गुन्ह्यातील चार संशयितांची पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ बुधवारी करण्यात आली.
या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेले रवींद्र भडांगे, भारत खेडकर, दीपक राजपतू व जयेश पटेल या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती चौघांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेत असलेले हेमंत पाटील व मोहसीन खान हे दोघेही पोलिस कोठडीत आहेत. संशयितांकडून ठोस माहिती, पुरावे मिळवण्याचे काम पोलिस करीत आहेत.