कोरोना लस आल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्राधान्य

मुंबई: वृत्तसंस्था । आयसीएमआरकडून कोरोना लस आल्यावर पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार उपक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्र सरकारच्यावतीने आयसीएमआरकडून काही सूचना आरोग्य विभागाला आल्या आहेत. लस साठ्याची पूर्वतयारी केली जात आहे. कोल्ड स्टोरेज महत्त्वाचे आहे. अशा डिस्ट्रीब्युटरर्सशी संपर्क साधला जात आहे. एसओपी मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या ट्रेनिंग देण्याचे काम सुरू केले आहे. ऐनवेळी लस आल्यावर धावपळ करण्यापेक्षा पूर्वतयारी करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सज्ज आहे, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

सध्या खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचारी यांचा डाटा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. लस येईल त्यावेळी या डाटाचा उपयोग होईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. यावेळी लोकांना किफायतशीर दरात एन- ९५ हा मास्क उपलब्ध करून दिला जाणार असल्याचा शासन आदेश काढल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

लस निर्मितीसाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही लस सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. केंद्र सरकारकडून तसे संकेतही वारंवार मिळत आहेत.

 

Protected Content