… नाहीतर लोटांगण आंदोलन करू

 

भुसावळ, प्रतिनिधी । भविष्यात भुसावळ नगरपालिकेतर्फे भूमिका जरी तुमची चूल बंद करण्याची, तुमचे रोजगार हिरवण्याची असली तरी तुमचे संसार उध्वस्त होऊ न देण्याची भूमिका आमची राहील व तुमची चूल आम्ही बंद होऊ देणार नाही. त्यासाठी संघर्ष अटळ व आंदोलन अटल राहील यासाठी ३० ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे दुपारी दोन वाजता लोटांगण जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे पी आर पीचे जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिवाळी, दसऱ्यात भुसावळ शहरातील सर्व व्यापारी व दुकानदार आणि अतिक्रमणधारकांनी रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवावीत असे आवाहन विविध १० संघटनांतर्फे जगन सोनवणे यांनी केले. तसेच नाथाभाऊ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांची युती खानदेशात आणि जळगाव जिल्ह्यात घट्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला आमदार संधी मिळेल अशी भूमिका श्री. सोनवणे यांनी मांडली. श्री. सोनवणे यांनी नाथाभाऊ यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्वागत केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची तिन्ही जिल्हाप्रमुख यांची लेखी पत्र देऊन जगन सोनवणे यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शगीर शाह रोशन शाह, सरपंच अनिल सुरवाडे, विशाल पवार, मनोहर पवार आदी उपस्थित होते.

Protected Content