‘इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद’ महोत्सवाचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ॲग्रोवर्ल्ड व कृषी विभाग (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी ते ग्राहक’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत शहरातील काव्यरत्नावली चौकात ‘इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद’ महोत्सवाचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं.

या प्रसंगी “‘शेतकरी ते ग्राहक’ या उपक्रमांतर्गत यामध्ये कोणी मध्यस्थ नसल्याने शेतकऱ्यांनाही बाजारभावापेक्षा दोन पैसे जास्त मिळत असून नागरिकांना अस्सल इंद्रायणी तांदूळ आणि सेलम हळद उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असून जळगावातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा” असं आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. यासह या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह ग्राहकांचे हित साधण्याचा प्रयत्न ॲग्रोवर्ल्डने केल्याचे सांगून या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केलं. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी स्वतः तांदूळ आणि हळदीची खरेदी केली.

यावेळी नगरसेवक अनंत जोशी, नगरसेवक नितीन बरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, पोखराचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. हा महोत्सव काव्यरत्नावली चौकात सोमवार, दि.७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असेल.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/635605367691823

Protected Content