जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालय जळगांव येथे विदयार्थ्यांसाठी आय. आय. टी. मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येणार्या स्पोकन ट्यूटोरिअल या उपक्रमांतर्गत चालविण्यात येणार्या फॉस क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी फित कापून उद्घाटन केले. प्रा. शिरीन पिंजारी यांनी स्पोकन ट्युटोरियल विषयी प्रास्ताविकात माहिती देतांना आयआयटी बॉम्बे यांच्यातर्फे स्पोकन ट्युटोरियल उपक्रम विद्यार्थ्यांना ओपन सोर्स सॉफ्टवेअर मिळवता यावे यासाठी चालू करण्यात आलेला आहे.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातीले तंत्रनिकेतन ३०० व पदवी चे २०० विद्यार्थी लाभ घेणार आहेत. स्पोकन टिटोरियल साठी महाविद्यालयाने मेंबरशिप सुद्धा घेतलेली आहे. यानंतर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना न्यू एज्युकेशन पॉलिसी २०२० व त्या अनुषंगाने स्पोकन ट्युटोरियल चे महत्व विशद करून सांगितले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी व्हावे जेणेकरून नवनवीन कल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजायला हव्यात. व त्या माध्यमातून नवकौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात होईल.
तंत्रनिकेतन समन्वयक प्राध्यापक दीपक झांबरे, अधिष्ठाता प्रा.अतुल बर्हाटे, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुरज चौधरी यांनी केले.