…आणि पोलिसांच्या मदतीला धावले गिरीशभाऊ !

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे आज पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या प्रसंगी ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी स्वत: गर्दीचे नियंत्रण करून आपल्यातील जोशीला कार्यकर्ता दाखवून दिला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा पार पडला. यात पंतप्रधानांनी युवा महोत्सवाच्या उदघाटन सत्रात हजेरी लावतांनाच काळाराम मंदिरात पूजा-अर्चना केली. दरम्यान, पंतप्रधानांच्या सभेले अपेक्षेनुसार प्रचंड गर्दी उसळली. मोदींना ऐकण्यासाठी लोक आणि त्यात देखील तरूणाई लक्षणीय संख्येने सभास्थळी आली होती.

याप्रसंगी गर्दीला नियंत्रीत करतांना पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी स्वत: पोलीस प्रशासनाच्या मदतीला मैदानावर उतरून गर्दीला नियंत्रीत करण्याचे प्रयत्न केले. यामुळे काही मिनिटांमध्ये गर्दी नियंत्रीत करण्यात यश मिळाले.

ना. गिरीशभाऊ महाजन यांना राजकारणात संकटमोचक म्हणून ओळखले जाते. पक्षाला अनेकदा पेच-प्रसंगातून वाचवण्यासाठी ते पुढे येत असतात. याच प्रमाणे ते अनेकदा थेट जनतेमध्ये उतरत असतात. आज नाशिकमध्ये असाच प्रसंग घडल्याने पुन्हा एकदा डॅशींग गिरीशभाऊ जगाला दिसल्याची चर्चा रंगली.

Protected Content