आता विद्यापीठात “३६ तासांचा अभ्यासक्रम” पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना उपलब्ध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  इन्स्टिट्युट ऑफ चॉर्टर्ड अंकाऊटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) च्यावतीने रोजगाराभिमुख ३६ तासांचा अभ्यासक्रम पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आयसीएआयच्या पश्चिम भारत विभागाचे अध्यक्ष सीए. अर्पीत काबरा यांनी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आयसीएआय जळगाव शाखा यांच्यात झालेल्या सामजंस्य करारातंर्गत लेखा संग्रालयाचे आणि करिअर समुपदेशन सत्राचे उद्घाटन सीए. काबरा यांच्या हस्ते सोमवार २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत झाले. यावेळी ते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती होती.

सीए. काबरा म्हणाले की, सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर सुरक्षा, टॅक्स आणि फायनान्स याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. आयसीएआयच्यावतीने ३६ तासांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. टॅक्सबाबत या अभ्यासक्रमात शिक्षण दिले जाणार आहे. सीएकडे असिस्टंट म्हणून अनकांची गरज असते. शिकत असतांना विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करून काही प्रमाणात पैसा प्राप्त करू शकतात. या लेखा संग्रहालयामध्ये लेखाविषयक संपूर्ण माहिती व इतिहास देण्यात आला आहे असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती देत विद्यार्थ्यांना या धोरणामूळे अनेक कौशल्य प्राप्त होणार आहे. आयसीएआयच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून दिल्या जाणा-या सर्व सोयी-सुविधाचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी आयसीएआयच्या जळगाव शाखेचे सचिव सीए. हितेश अगीवाल यांनी जळगाव शाखेची माहिती दिली. प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे यांनी प्रशाळेची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रमेश सरदार यांनी केले. प्रा. आर. आर. चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, आयसीएआयचे सीए. सौरभ अजमेरा, सीए. केतन सैया, सीए. ममता राजानी, सीए. श्वेता जैन, सीए. पियुष चांडक, सीए. अभिषेक कोठारी, सीए. रोशन रूणवाल, सीए. सोहन नेहेते, सीए. व्ही. के. बिर्ला आदी उपस्थित होते.

Protected Content