मनपास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींंमध्ये महेवीश काजी व मुलांंमध्ये अयान पटनी विजयी

WhatsApp Image 2019 08 22 at 7.02.35 PM

जळगाव, प्रतिनिधी | हौशी कॅरम संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे सहकार्याने १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या जळगाव महापालिकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान यांच्या हस्ते कांताई सभागृह येथे करण्यात आले.

यावेळी स्पर्धेचे आयोजक जैन स्पोर्टस अकॅडमीचे सय्यद मोहसीन व महंमद फजल हे उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ४० मुला-मुलींनी भाग घेतला होता.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण साठी एमआयएमचे तालुका अध्यक जिया बागवान, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, स्पोर्ट्स हाऊसचे ॲड. आमीर शेख व स्पर्धा आयोजक सय्यद मोहसीन, मुख्य पंच मोहम्मद फजल, शेख वसीम, सय्यद जुबेर, व राष्ट्रीय कॅरमपटू योगेश धोंगडे व सर्व क्रिडा शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धेच्या निकाल मुले : अयान असलम पटणी (इकरा शाहीन जुनियर कॉलेज) ,शेख मुजाहिद (मिल्लत जुनियर कॉलेज) , मतीन खान (ईकरा शाहीन जुनियर कॉलेज) , मोहसीन शेख (अँग्लो उर्दू जुनियर कॉलेज ),शेख फरहान (मिल्लत उर्दू जुनियर कॉलेज), शेख मुजफ्फर रज्जाक ( मिल्लत उर्दू जुनियर कॉलेज), शाहिद शेख (अँग्लो उर्दू जुनियर कॉलेज ) , विष्णू भाटिया( स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय)

स्पर्धेचा निकाल मुली : महेविश काजी (ईकरा शाहीन जुनिअर कॉलेज) , रिया संदीप पाटील (नंदिनीबाई वामनराव विद्यालय ),अयमन देशमुख (इकरा शाहीन जुनिअर कॉलेज ) , शेख उसवा अंजुम (इकरा शाहीन जुनिअर कॉलेज) , सानिया मिर्झा (ईकरा शाहीन जुनिअर कॉलेज), अल्बिना खान (इकरा शाहीन जुनिअर कॉलेज)

Protected Content