धावत्या रेल्वेखाली आल्याने वृध्दाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या अप रेल्वे लाईनवर एका ६० वर्षीय वृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुकराम देविसिंग गोंड (वय-६०) रा. वसंतपूर जि.अनकपूर मध्यप्रदेश ह.मु. रेल्वे स्टेशन परिसर, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव ते शिरसोली रेल्वेच्या अप लाईनवर रेल्वे खंबा क्रमांक ४१० च्या १४ नंबरजवळ गोदान एक्सप्रेसच्या समोर आल्याने सुकराम गोंड याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी गोदान एक्सप्रेसचे लोकोपायलट एस.टी. सुरवाडे यांनी जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक ठाकुर यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार ठाकूर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली.

जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ. गुलाब माळी, अनिल फेगडे, प्रकाश चिंचोरे आणि भुषण सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेवू मृतदेहाचा पंचनामा केला. सुरूवातीला अनोळखी म्हणून तालुका पोलीसात नोंद करण्यात आली होती. पोलीसांनी सोशल मिडीयावर ओळख पटविण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्याच्या सोबत काम करणाऱ्यांनी मयताची ओळख पटविली. सुकराम देविसिंग गोंड असे मयताचे नाव निष्पन्न झाले. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.

Protected Content