डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोना काळापासून कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण करतात कामावरून कमी करण्यात आले. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळापासून ते आतापर्यंत कार्यरत असलेल्या राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे ८ हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर हे काम करत आहे. आरोग्य विभागात कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर जीवाची परवा न करता वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना लसीकरण ते कोविड टेस्टिंगपर्यंत सर्व ऑनलाईन पद्धतीने कामे करून जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत, असे असताना आता कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना कामावर कमी केले जात आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुदर्शन कोळी व अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

Protected Content