जळगाव शहरातील रस्त्यांची दुरूस्ती तातडीने करावी (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिका प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे कोट्यावधी निधी प्राप्त होवूनही रस्त्यांची कामे होत नाही. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेवून रस्त्यांची कामे करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

 

जळगाव शहरात रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्थ शहरात निर्माण झाली आहे. पावसाळ्यात नवीन रस्त्यांची कामे सुरू करता येणार नसल्याने नागरीकांचे भयानक हाल होत असुन तात्पुरता दिलासा म्हणुन बांधकामाचे वेस्ट मटेरियल किंवा मुरूम, विटांचा कच टाकुन रस्त्यांची दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून रस्त्यातील खड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यामुळे डासाचे प्रमाण वाढलेले असून साथीचे आजार पसरण्यची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्वरित रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content