रस्त्याचे काम वेळेत न सुरू केल्यास ठेकेदार जाणार काळ्या यादीत !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाण पूलापासून ते दूध फेडरेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन देखील गणेशोउत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज बुधवारी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिले आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपूलापासून ते दूधफेडरेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप अडचणींचा होत आहे. तसेच काही दिवसापासून कानळदा रस्त्यापासून ते भोईटेनगर रेल्वेगेटपर्यंत पुलाचे काम सुरु असल्याने हा रस्ता खड्डेमय बनलेला आहे. शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा रस्ता दिवसेंदिवस खराब होत असून जागोजागी रस्त्यावर खड्डे पडल्याने पाणी साचलेला आहे. त्यामुळे लहानमोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपूलापासून ते दूधफेडरेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी यांनी केली आहे.

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने मंजूर केलेल्या ४२ कोटींच्या आराखड्यातील ५ कोटी रूपये रक्कम प्राप्त होऊन देखील प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुचना देण्यात आले होते. या रस्त्याची दुरूस्ती गणेशोत्सवापुर्वी न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज बुधवारी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिले आहे.

Protected Content