राजमाता जिजाऊ सहकारी सूतगिरणीसाठी ८० कोटीचा निधी मंजूर

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी प्रकल्पाला ८० कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. त्यानिमित्ताने माजी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवाराच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी माहीती अशी की, अमळनेर शहरातील राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास ८० कोटी रूपयांचा निधी सुधारित प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा केला. तसेच प्रकल्प अहवालास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Protected Content