गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थामध्ये स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती निमीत्त अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय आणि गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये स्वामी विवेकानंद आणि माँ साहेब जिजाऊ जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी संचालिका डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांचेसह कर्मचारी वर्ग उपस्थीत होता.

गोदावरी नर्सिग महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. विजय पाटील,डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी, कृषि, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ. अशोक चौधरी, डॉ. शैलेश तायडे, डॉ. पुनमचंद सपकाळे, डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ होमीओपॅथी येथे प्राचार्य डॉ. डी.बी.पाटील, गोदावरी इग्लिश मिडीयम स्कुल येथे प्रिन्सीपल निलीमा चौधरी, डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल भुसावळ येथे प्रिन्सीपल अनघा पाटील, डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल सावदा येथे प्रिन्सीपल भारती महाजन,गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च येथे संचालक डॉ. प्रशांत वारके,डॉ वर्षा पाटील वृमेंन्स कॉलेज ऑफ कॉम्युटर अ‍ॅप्लीकेशन येथे संचालक डॉ. निलीमा वारके,डॉ वर्षा पाटील वृमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स येथे प्राचार्य उज्वला मावळे, हरीभाऊ इन्स्टीटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे प्रिन्सीपल पुनीत बसन ,डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालय येथे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते.

Protected Content