पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील रताळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) युवा जिल्हा चिटणीस उद्धव पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, सचिन वाघ, प्रल्हाद पाटील, शांताराम पाटील, सतिष गढरी, हिरामण पाटील, हरचंद पाटील, सुकलाल भिल, राकेश पाटील, शामराव भिल, आबा भिल, अनिल विनायक भिल, दादाभाऊ पाटील, वाल्मिक पाटील, प्रविण भिल, समाधान पाटील यांचेसह असंख्य ग्रामस्थांनी आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि सभोवतातील गावांचा होत असलेला झपाट्याने विकासाला प्रेरित होऊन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी या ग्रामस्थांचे मा.अमोलदादा पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले. तसेच आपल्या गावातील लोकाभिमुख व गावाचा वैभवात भर घालणाऱ्या विकासकामांना आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमाने प्राधान्याने मंजुर करून आपल्या समस्यांची दखल घेणार असुन गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव आपल्या सोबत असल्याचे अमोल पाटील यांनी आश्वासित केले. प्रसंगी पारोळा नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील, करमाड येथील गुलाब पाटील, सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, सुभाष वंजारी, रोहीत पाटील, जयेश पाटील, हर्षल पाटील, रताळे येथील संदीप गढरी, लक्ष्मण पाटील, हेमराज पाटील, विक्रम गढरी, हिम्मत पाटील, सुनिल पाटील, नंदु चव्हाण, नागो चव्हाण, सुधाकर पाटील, आबा पाटील, शांताराम पाटील, शांताराम पाटील, ऋषिकेश गढरी, शिवरे येथील पोलीस पाटील तुकाराम पाटील, श्याम पाटील, मेहु पोलीस पाटील अनिल पाटील, पारोळा येथील कैलास पाटील, कोमल पाटील, मयुर भोई यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.