‘बिग बॉस’ मधील स्पर्धक बिचुकलेंना निवडणूक आयोगाची नोटीस

abhijit bichakule

मुंबई प्रतिनिधी । ‘बिग बॉस’ मराठी सिझन दोनचे स्पर्धक अभिजीत बिचुकले हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असून मतदारसंघातून जोरदार प्रचार करीत आहेत. मात्र, या प्रचारा दरम्यान, बिचुकलेंना निवडणुक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगाला दैनंदिन प्रचाराचा हिशोब द्यावा लागतो. मात्र, बिचुकलेंनी दिवसाचा हिशोब न दिल्यामुळे आज निवडणुक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.

तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी येथील बिचकुले यांच्यासह दोन उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी येथील तीन उमेदवारांना आज निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निश्चित केलेला दैनिक खर्च सादर न केल्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या दैनिक खर्चात दिवसभरात होणारा खर्च, वह्यांची नोंद आदी खर्च सादर न केल्याने अभिजीत वामनराव बिचकुलेंसह विश्राम तिडा पाडम आणि महेश पोपट खांडेकर या तीन उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Protected Content