यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका आरोग्य विभागाकडुन गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्षयरोग आजार कसा बरा होतो व त्यावर काय उपचार केले पाहिजे या विषयावर गावातील गणेश मंडळा समोर विविध उपक्रम राबवुन नागरीकांमध्ये जनजागृती अभियानाचे उपक्रम यशस्वीरित्य राबविण्यात आले.
क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी यांची मार्गदर्शनाखाली क्षयरोग विभागातील नरेद्र तायडे मिलींद राणे, साकळी येथील डॉ. मनिष चौधरी, डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या प्रयत्नाने यावल तालुक्यातील मनवेल गावातील श्री गणेश मंडळा समोर आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
क्षयरोग आजार हद्दपार करणे, पोषण आहार, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील अधिपरीचारीका वृषाली पाटील यांनी केले. यावेळी शिरसाड तालुका यावल येथील उपकेद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मा परविन नमुउद्दीन शेख, आरोग्य साह्यक नितीन वाळुंज या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. सदरचे जनजागृतीपर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा स्वंयमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.