जळगाव,प्रतिनिधी | के. सी. ई. सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या तलवारबाजी मध्ये मुली विजयी तर मुलं उपविजयी झाले.
म.न.पा. जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित जिल्हास्तरीय तलवारबाजीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये एकूण ४ संघ सहभागी झालेले होते. या स्पर्धा १४ वर्षा आतील मुले,मली व १७ वर्षाआतील मुले, मली यांच्यात घेण्यात आल्या. सदर विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धा या नाशिकला होणार आहे. विजयी संघाने मिळविलेल्या व त्यांची विभागीय स्तराला निवड झाली त्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जी. बेंडाळे, शाळेचे प्राचार्य संदीप साठे व शिक्षक शिक्षकेतर कर्मच्याऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. संघ विजयी होण्यासाठी राजेंद्र बढे, आकाश सराफ यांनी परीश्रम घेतले व त्यांचे मार्गदर्शन लाभले.