कोरोना : जिल्ह्यात आज ४८ बाधित रूग्ण आढळले; ४९ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्‍हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या जिल्ह्यातून आज ४८ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ४९ रूग्ण कोरोना मुक्त झाली आहेत. आज अवघे पाच तालुके निरंक आले असून भुसावळ तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-८, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-३, एरंडोल-०, जामनेर-४, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-११, बोदवड-१, इतर जिल्हे-१ असे एकुण ४८ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार ५५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार ३३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४०५ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Protected Content