जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर दुपारी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१७ टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी मतदान हे जळगाव शहर मतदारसंघात ३९.११ टक्के मतदान झाले तर सर्वात जास्त मतदान हे रावेर मतदारसंघात ६१.४२ टक्के झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील इतर मतदार संघातील सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. यात चोपडा ५५.३३ टक्के रावेर ६१.४२ टक्के,भुसावळ ४१.२६, जळगाव शहर ३९.३१, जळगाव ग्रामीण ५२.६९, अमळनेर ५८.६८, एरंडोल ५५.७७, चाळीसगाव ५५.७५, पाचोरा ५२.१२, जामनेर ५९.१४, मुक्ताईनगर ६०.४८ सरासरी ५४.१७ टक्के मतदान झाले आहे.