जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला केराची टोपली दाखवत फैजपुरात पुन्हा सट्टा जोमाने सुरू

फैजपूर, प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असतांना सुद्धा मात्र फैजपूर शहरसह परिसरात सट्टा जुगार खुलेआम सुरू आहे याचं शुक्रवारी पोलिसांनी सट्टा जुगारावर कारवाई करूनही शहरात मात्र सट्टा खुलेआम सुरू आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतांना सुद्धा स्थानिक पोलिसांनी शहारासह परिसरात अवैध धंदे सुरू करण्याचा निर्णय घेतला म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली स्थानिक प्राशनाने दाखवली आहे. लॉकडाऊनचा कालावधी असल्याने  ५ जणांच्या वर जमाव बंदीचे आदेश असतांना सुद्धा शहरात सट्टा सुरू असल्याने शासकीय नियम धाब्यावर बसवून सट्टा सुरू आहे. या ठिकाणी सट्टा लावणाऱ्या नागरिकामांध्ये कुठलेही सोशल डिस्टन्स न पाळत जमाव एकत्र येत आहे. हे कोरोना सारख्या भयंकर आजाराला पुन्हा घातक ठरू शकते. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लक्ष घालून शहरासह परिसरात सुरु असलेला सट्टा बंद करण्यात यावा, अशी मागणी नागरिक केली आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.