लंडन, वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही सुरू झाली आहे. रशिया, चीनने विकसित झालेली लस आपात्कालीन परिस्थितीत वापरण्याची परवानगी दिली आहे. युरोपमध्ये लसीशिवाय लॉकडाउनने कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्य आहे असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप प्रमुखांनी केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे युरोप विभागाचे प्रमुख हॅन्स क्लूग यांनी सांगितले की, हा विजय लशीमुळेच मिळेल असे नाही. युरोपमध्ये संसर्गाला अटकाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाउन करावे लागेल कोरोनासोबत रहाण्याची तयारी करावी लागेल दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लॉकडाउन लागू होईल असे वाटत नाही. मात्र, स्थानिक पातळीवर कडक लॉकडाउनचे निर्बंध लागू होऊ शकतात,
बाधितांमधून हा विषाणू नष्ट करण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागत असल्याचे इटलीच्या संशोधकांनी म्हटले आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा चाचणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इटलीतील मॉडेना अॅण्ड रेजियो एमिलिया विद्यापीठाचे डॉ. फ्रान्सिस्को वेंतुरेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ११६२ रुग्णांचा अभ्यास केला. यामध्ये करोनाबाधितांची दुसऱ्यांदा चाचणी केल्यानंतर १५ दिवसांनंतर, तिसऱ्यांदा १४ दिवसानंतर आणि चौथ्यांदा नऊ दिवसानंतर चाचणी करण्यात आली. यामध्ये ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली, त्यांची चाचणी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आली. ५० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना ३५ दिवस आणि ८० व त्याहून अधिक वयाच्या बाधितांची प्रकृती बरी होण्यास ३८ दिवस लागतात.
जागतिक आरोग्य संघटनेने मार्च ते जून या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे जगातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास ९० टक्के देशांमधील आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. या संसर्गामुळे अनेक नियमित आरोग्य तपासण्या , तक्रारींचे निदान लांबणीवर पडले आहे. कर्करोगाच्या उपचारावर मोठा परिणाम झाला आहे.