सध्याचा दलित स्वतः झुकत नसल्याने अन्य लोकांना राग – रामदास आठवले

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ‘दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल भाजप सरकारला दोष देता येत माही समाजाची धारणा दोषी आहे. आजचा दलित चांगले राहू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून अशा अत्याचाराच्या घटना वाढत आहेत’, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘घेतली आहे एका मुलाखतीत त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

या मुलाखतीत दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचं रामदास आठवले यांनी नाकारलं नसलं तरी यामागे सामाजिक भेदभाव कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘हे खरं आहे की एका वेळेपर्यंत भाजपला ब्राह्मणांचा पक्ष म्हटलं जात होतं. परंतु, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला सगळ्यांनी मतं दिलीत. आता तो मागासवर्गीयांचा आणि अल्पसंख्यांकाचाही’ असं ते म्हणाले
काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थानात आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही अशा घटना वाढल्यात. कायदे आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारांचा विषय आहे.. सोबतच समाजालाही बदलावं लागेल. आम्हाला आरक्षण नको, पण यासाठी पहिल्यांदा देशातून जातिवाद संपायला हवा… जेव्हापर्यंत जातिवाद आहे तेव्हापर्यंत आरक्षण हीच आमची ताकद असेल असेही ते म्हणाले

‘आरक्षणात आरक्षण’ या मुद्यावर बोलताना त्यांनी याला आक्षेप नसल्याचं म्हटलंय. ही गोष्ट बोलायला सोपी आहे परंतु, ती लागू करणं तितकंच कठीण आहे, कोणत्याही आरक्षित वर्गात येणाऱ्या जातीतील लोकसंख्या आणि त्यांचा साक्षरता दर वेगवेगळा आहे. कोणत्याही आरक्षित वर्गातील ज्या जाती शिक्षणात मागे असतील त्यांच्या शिक्षणावर जोर द्या, नोकरीत ते स्वत:च बरोबरी करतील, संविधान आहे तोपर्यंत देशात आरक्षण व्यवस्था कुणीही नष्ट करू शकत नाही. असंही त्यांनी सांगितलं

Protected Content