अडवाणींच्या घरी नेत्यांची गर्दी

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । बाबरी मशीद विध्वंस खटल्यात भारतीय जनता पक्षाचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण आडवाणी , मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्वच ३२ आरोपींची लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांचे अभिनंदन केले आहे. कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निकालानंतर लागलीच आडवाणी यांच्या निवासस्थानी भेट दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उशिरा का होईना, पण न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हा न्यायाचा विजय असल्याचे म्हणाले. लखनऊच्या विशेष न्यायालयाने बाबरी प्रकरणी लालकृष्ण आडवाणी, कल्याण सिंह, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह ३२ आरोपी कोणत्याही कटात सहभागी नव्हते असे म्हटले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. उशिरा का होईना पण न्यायाचा विजय झाला आहे, हेच या निकालाने सिद्ध केले आहे, असे राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Protected Content