दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दिलासा व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आज प्रसिद्ध मेंदु रोग तज्ञ डॉ. मनोज पाटील यांचे ” व्यसनांचे मेंदु वर होणारे दुष्परिणाम”” या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समाजात वाढणारी व्यसनाधीनता आज तीव्र रूप धारण करीत आहे. त्यामुळे रस्ते अपघात वाढले असुन, अपघातात मेंदूला जखम होऊन मृत्यू तसेच कायमचे अपंगतव येण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. व्यसनाधीनता मुळे मेंदु वर आघात होऊन त्याचे घातक परिणाम होतात, असे प्रतिपादन प्रसिध्द मेंदु रोग तज्ञ डॉ. मनोज पाटील यांनी केले. २६ जानेवारी हा दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचा २३ वा वर्धापन दिवस या दिवसाचे निमित्त साधून दिलासा व्यसनमुक्ती केंद्रात डॉ. मनोज पाटील (निक्लियस hospital जळगाव) यांचे “व्यसनांमुळे मेंदूवर होणारे दुष्परिणाम” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

मनुष्याच्या केसांपासून ते तळ पाया पर्यंत चे आजार होतात. त्यात प्रामुख्याने शरीरातील नाजुक अवयव मेंदूवर घातक परिणाम होतात. ज्यात व्यक्तीला स्मृतिभ्रंश व इतर मानसिक आजार जडतात. यासाठी योग्य उपचारांची गरज असते, दिलासा व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्तींवर केले जाणारे उपचार शास्त्रोक्त आहेत. असे डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले. डॉ. मनोज पाटील यांचा दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे वतीने अध्यक्ष साहेबराव पाटील यांनी शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वसाने यांनी संस्था करीत असलेल्या व्यसनमुक्ती कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी राजु वाघ, हर्षल बावीस्कर, निकेश महानुभाव, जितु ठाकुर यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Protected Content