प्रलंबित मागण्यांसाठी वैद्यकीय अध्यापकांनी काढला कॅन्डल मार्च

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातव्या वेतन आयोगाप्रमाणे विविध प्रकारचे भत्ते मिळाले पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांनी जळगावात ‘कॅन्डल मार्च’ काढून लक्ष वेधून घेतले.

सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे विविध प्रकारचे भत्ते मिळाले पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक १४ मार्चपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी ४ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावात कॅन्डल मार्च काढून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कॅन्डल मार्च काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी १४ मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन विविध प्रकारचे आंदोलन करीत आहे.

सोमवारी ७ मार्च रोजी थाळीनाद आंदोलनासह १४ मार्चपर्यंत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, अधिष्ठाता यांना घेराव असे विविध प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ. अरुण कसोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. इमरान तेली, डॉ. वैभव सोनार, डॉ. भारत घोडके, डॉ. विजय गायकवाड, डॉ. धनश्री पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. अंजली वासडीकर, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. मनोज पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. किरण सोनवणे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मोनिका युनाती, डॉ. अक्षय सरोदे आदि अध्यापकांनी शुक्रवारी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला.

Protected Content