गोदावरी आयएमआर महाविद्यालयात एमबीए प्रवेशास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता एमबीए अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असून त्याबाबतचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहिर केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पूर्वी ज्या पद्धतीने महाविद्यालयात कागदपत्र पडताळणीसाठी सुविधा केंद्र सुरु असायचे तशी पद्धत यावर्षी न राबविता स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ई स्कुटिनी सेंटर सुरु करण्यात आले आहे.

गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चने हे सेंटर सुरु केले आहे. त्याचा क्रमांक ील ५१०२ असून त्यावर विद्यार्थी आपले ऑनलाईन कागदपत्र अपलोड करु शकतील व त्याची ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र पडताळणीही महाविद्यालयाच्या ई स्कुटीनी सेंटरद्वारे होणार आहे. या सेंटरमध्ये नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची नावे अंतिम मेरीट लिस्टमध्ये येणार नाही व शिष्यवृत्तीसही अपात्र ठरु शकतील.  

असे आहे वेळपत्रक 

८ ते १३ डिसेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली जाणार असून १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पडताळणी केली जाणार आहे. १६ डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येणार आहे. १७ व १८ डिसेंबर रोजी सुचना, बदल अथवा तक्रार नोंदविता येणार असून २० डिसेंबर रोजी अंतिम मेरीट लिस्ट जाहिर करण्यात येणार आहे. पहिला कॅप राऊंड २१ ते २३ डिसेेंबर व दुसरा कॅप राऊंड ३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासंबंधीच्या विविध अडचणींसाठी प्रा.चंद्रकांत डोंगरे (७५०७७०००७५) आणि प्रा.चेतन सरोदे (९८६०६००१६५) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

Protected Content