भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यार्थ्यांनी जंक फूडच्या नादी न लागता पौष्टिक जेवण व व्यायाम केल्यास शरीर निरोगी व निकोप राहून त्यामुळे अभ्यास करतांना मन स्थिर रहाते असे प्रतिपादन भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. येथील भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत चिरंतन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. त्याप्रसंगी उमेश नेमाडे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी बी.जी. सरोदे होते.
प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी आणि प्राथमिक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेश फेगडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . याप्रसंगी उमेश भाऊ नेमाडे यांनी संस्कार, परिश्रम व आरोग्य या त्रिसूत्रींचे महत्त्व सांगितले. तसेच युवराज लोणारी व गणेश फेगडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सातपुडा शिक्षण संस्था भुसावळचे सर्व कार्यकारणी मंडळ तसेच भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर भुसावळचे शालेय समिती संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ. शिल्पा केदारे यांनी केले व आभार उपशिक्षिका सौ. भारती बैरागी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.