तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयिताला अटक

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील दिनदयाळ नगर भागामध्ये लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी २८ जून रोजी दुपारी १.३० वाजता कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत जगदीश पैठणकर रा. कान्हाळा रोड भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील नगर परिसरामध्ये संशयित आरोपी हेमंत पैठणकर हा हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार शुक्रवारी २८ जून रोजी दुपारी १.३० वाजता कारवाई केली व त्यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी हेमंत पैठणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी हेमंत पैठणकर याचे विरोधात मुसळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत पाटील करत आहे.

Protected Content