आगामी लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज; तहसीलदार बंडू कापसे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर रावेर व यावल विधानसभा क्षेत्रात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याचे तहसीलदार बंडू कापसे यांनी सांगितले.यावेळेस महीला मतदारांसाठी सखी मतदान केंद्र प्रशासना तर्फे उभारण्यात येणार आहे

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होणार आहे.याच पार्श्वभुमीवर रावेर व यावल विधानसभा मतदार संघात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघात ३१४ बूथ असुन निवडणुक पक्रियामध्ये तब्बल १५०० कर्मचारी निवडणुकीचे काम बघणार आहे. तर महीलांना मतदानासाठी तीन सखी बूथ उभारण्यात येणार असल्याचे तहसिल प्रशासनाकडून सांगण्यात आले
मतदार संघात सर्वात लांबचे मतदान केंद्र चारमळी आहे.आंचारसहीता लागताच रावेर तालुक्यातील पाल शेरी नाका व चोरवड चेकपोष्ट येथे प्रत्येकी एक चेकपोष्ट ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार बंडू कापसे यांनी सांगतिले यावेळी त्यांच्या सोबत निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे देखिल सहकार्य करीत आहे.

Protected Content