महिलेची मंगलपोत धुम स्टाईलने चोरट्यांनी केली लंपास

 

रावेर, प्रतिनिधी। मोटर सायकलवर येऊन दोघांनी महिलेच्या गळ्यातील ४८ हजार किमतीची मंगलपोत चोरुन नेल्याची घटना जूना सावदा रोडवर शुक्रवारी रात्री घडली चोरटया विरुध्द रावेर पोलिस स्थानकात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत वृत्त असे की, रावेर शहरातील पिपल्स कॉलनी रहिवासी जयश्री प्रकाश पाटील या रात्री जूना सावदा रोडने फिरण्यासाठी गेल्या होत्या. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास अँमेझॉन डिलेव्हरी मोटर सायकलवर मागून आलेल्या दोन अज्ञात चोरटयानी त्यांच्या गळ्याती १२ ग्रॅम सोन्याची मनीमंगळ सूत्र असलेली पोत जबरीने खेचुन चोरुन नेली आहे.

याबाबत जयश्री पाटील यांनी दिलेल्या फिर्यादि वरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली साहाय्यक पोलिस निरीक्षक शितल कुमार नाईक करत आहे.

Protected Content