ब्रेकिंग : पवारांनी थांबवलं नाहीतर ते आजच देणार होते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं असल्याचे वृत्त समोर येत आहे.

राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना आणखी एक महत्वाची माहिती समोर असून उद्धव ठाकरे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते पण शरद पवार यांनी त्यांना रोखलं आहे. यापूर्वीही एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते तेव्हाही पवार यांनी त्यांना रोखलं होतं.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची घोषणा करणार होते. पण त्या अगोदर शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना या निर्णयापासून रोखलं असल्याची माहिती आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.