युवा सेनेतर्फे रक्ताने पत्र लिहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुका युवासेना व शिवसेना यांची बैठक शहरातील विशाल लॉन येथे पार पडली. यात युवासेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील यांच्या रक्ताने पत्र लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.

संपर्क प्रमुख विलास पारकर आणि विलास पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत जामनेर तालुक्यातील ५१ युवासेना पदाधिकाऱ्यांनी रक्ताने अंगठ्याचे ठसे या पत्रावर लावले.

सदर बैठकीमध्ये “जे सोडून गेले ते गद्दार असून सर्व जे खरे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागावे,” असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीला डॉ. मनोहर पाटील, विश्वजीत पाटील, भरत पवार, सांडू गुरव, निळकंठ पाटील, ज्ञानेश्वर जंजाळ, सोनवणे, भैया गुजर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची संख्येने उपस्थिती होती

Protected Content