निधी उभा करून सर्व बसेस इलेक्ट्रीक, अत्याधुनिक करणार – उपमुख्यमंत्री

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यातील एसटी परिवहन महामंडळाच्या अडचणीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न मविआ सरकारने केला आहे. तसेच मेट्रोसाठीदेखील काही कोटी रुपये खर्च करत आहे.  तर एकदा एकत्र बसून लागणारा निधी उभारणी करीत सर्व बसेस इलेक्ट्रीक, अत्याधुनिक करु, असा  मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

एसटी महामंडळाचे ७५ व्या वर्षात पदार्पण होत असताना आज उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते ‘शिवाई’ या विजेवर धावणाऱ्या पहिल्या वातानुकूलित एसटीचे लोकार्पण पुणे येथे करण्यात येणार आले. यावेळी एसटीच्या सर्व बसेस इलेक्ट्रीक करण्यासह इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे उभारणी करीत गोरगरिबांची एसटी वर्षानुवर्षे चालत राहावी यासाठी प्रयत्न करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाची विजेवर धावणारी प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी पहिली वातानुकूलित बस पुणे ते नगर मार्गावर धावणार आहे. या गाडीचे भाडे २७० रुपये असल्याचे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मी सुद्धा बऱ्याचवेळा एसटीने प्रवास केला आहे. सर्वसामान्यांना परवडणारे एसटी हे प्रवासाचे वाहन आहे. आमच्या गाडीचे पायलट असतात ते वेगाने गाडी चालवतात, कधीमधी खासगी गाडीत बसतो. सरकारची बचत करण्यासाठी आता ठरवले की खासगी गाडी वापरायची नाही. सरकारमध्ये आहे तोपर्यंत सरकारी गाडी वापरणार, असेही अजित पवार म्हणाले.  

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!