अंशिका पाटील आयटीएस परिक्षेत राज्यातून द्वितीय

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील होळ येथील कु. अंशिका अमोल पाटील ही विद्यार्थीनी आयटीएस परिक्षेत राज्यातून द्वितीय आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत तालुक्यातील होळ येथील इयत्ता तिसरीत शिकणारी  कु. अंशिका अमोल पाटील हिने घवघवीत यश संपादित करत २०० पैकी १९६ गुण मिळवत राज्यातुन दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळविला आहे. कु. अंशिका पाटील ही पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अंमलदार अमोल पाटील यांची सुकन्या आहे. कु. अंशिका हिने संपादीत केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!