बिअर शॉपी फोडून देशी विदेशी दारू लंपास करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील चिंचोली येथील बिअर शॉपी फोडून दुकानातील ७२ हजार रूपये किंमतीचे दारूचे बॉक्स चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

 

दिनकर उर्फ पिन्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील सागर वासूदेव लाड (वय-२४) यांचे गावातील हॉटेल सायलीच्या मागे सागर बिअर शॉपी आहे. ३ मे रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे शॉपी बंद करून घरी गेले होते. बिअर शॉपी फोडून सुमारे ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा प्रकार ४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आला. सागर लाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिनकर उर्फ पिन्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. सुप्रिम कॉलनी याला बुधवारी १ जून रोजी मध्यरात्री सुप्रिम कॉलनीतून अटक करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

 

https://livetrends.news/the-beer-shop-was-blown-up/

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!