वाजपेयी नव्हे तर राव होते भाजपचे पहिले पंतप्रधान ! : अय्यर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अटलबिहारी वाजपेयी नव्हे तर नरसिंम्हा राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते, तसेच राजीव गांधी यांचा राम मंदिराचे दरवाजे उघडण्याचा निर्णय हा सपशेल चुकीचा होता ! अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या ‘मेमोयर्स ऑफ ए मॅव्हरिक – द फर्स्ट फिफ्टी इयर्स (१९४१-१९९१)’ या आत्मचरित्रात अनेक मोठे गौप्यस्फोट आणि खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने राजीव गांधी यांच्यावर त्यांनी टिका केली आहे. पुस्तकात त्यांनी राजीव गांधींबद्दल लिहिले आहे की, राजीव गांधींना पंतप्रधान बनवल्यावर मला आश्चर्य वाटले. पायलट देश कसा चालवणार, पण त्याचं काम पाहून त्यांनी कौतुक केलं. मात्र अयोध्येतील राम मंदिराचे कुलूप उघडण्याचा आणि पायाभरणीला परवानगी देण्याचा तात्काळ पंतप्रधानांचा निर्णय चुकीचा होता. याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागल्याचे अय्यर यांनी नमूद केले आहे.

 

दरम्यान, आपल्या आत्मचरित्रात त्यांनी नरसिंह राव यांच्यावर देखील टिका केली आहे. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नसून नरसिंह राव होते. पीव्ही नरसिंह राव किती जातीयवादी आणि किती हिंदुत्ववादी होते हे काम करताना मला कळले होते असे अय्यर यांनी पुस्तकात नमूद केले आहे. बाबरी मशिदीचा मुद्दा हा तत्कालीन सरकारला चांगल्या पध्दतीने हाताळता आला नसल्याची टिका देखील त्यांनी केली आहे.

 

मणिशंकर अय्यर यांनी सांगितले की, एकदा अय्यर पीव्ही नरसिंह राव यांच्यासोबत राम-रहीम यात्रा काढत होते. त्या वेळी राव यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या यात्रेला त्यांचा आक्षेप नाही, परंतु त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येवर त्यांचा आक्षेप आहे. अय्यर म्हणतात की जेव्हा मी त्यांना विचारले की माझ्या व्याख्येमध्ये काय अडचण आहे. ते म्हणाले की मणी तुम्हाला समजत नाही की हा हिंदू देश आहे. याचा आपल्याला मोठा धक्का बसला. भाजपही तेच म्हणत असल्याचे अय्यर यांनी त्यांना उत्तर दिल्याचे नमूद केले आहे. मात्र राव हे खर्‍या अर्थाने भाजपच्या विचारधारेचे होते असा दावा अय्यर यांनी केला आहे.

Protected Content