भरधाव ट्रकच्या धडकेत वयोवृद्धा ठार

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने नांदगावकडून धुळेकडे जाणाऱ्या एका ट्रकने वयोवृद्धाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील देवळी येथील अशोक शांताराम मराठे (वय-६५) हे चाळीसगावला एका हॉटेलात कामाला आहे. मात्र काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मराठे हे रस्ता ओलांडताना अचानक टाटा कंपनीच्या भरधाव ट्रकने (क्र. एम.एच. आर.जे ११ जीसी ०५१३) त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी त्यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु अपघात घडताच चालक वाहनांसह पसार झाला.

 

सदर अपघात हे खडकी बायपासला घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी हॉटेल व्यावसायिक यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना राकेश पाटील करीत आहे.

Protected Content