Home धर्म-समाज माझी हत्या झाल्यास आपण पावलं उचलावीत – सदावर्तेंची फडणवीस, शाह यांना विनंती

माझी हत्या झाल्यास आपण पावलं उचलावीत – सदावर्तेंची फडणवीस, शाह यांना विनंती

0
62

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुणरत्न सदावर्तेंची तब्बल १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली असून सुटका होताच माझी हत्या झाली, तर ते घडण्याआधीही योग्य ती पावलं उचलावी.” अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिला असून त्यामुळे त्यामुळे पुणे पोलीस आता त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर पुढे अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.

“कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं.  मी जेलमधून सांगितलं होतं म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेलेत” असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.


Protected Content

Play sound