संजय गांधी निराधार समितीची बैठक संपन्न – महसुलच्या कारभाराबाबत समितीत नाराजी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील तालुका संजय गांधी निराधार समितीची त्रेमासिक सर्वसाधारण बैठक समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विविध गावामधील सुमारे २४० निराधारांची प्रकरणास मान्यता देण्यात आली मात्र समिती अध्यक्ष व सदस्यांनी महसुलच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

यावल येथील तहसीलच्या प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात आज संजय गांधी निराधार समितीची बैठक समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची त्रेमासिक बैठक संपन्न झाली.

बैठकीस तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य तुषार सांडुसिंग पाटील, राजु अरमान तडवी, जावेद अहमद महमंद अली, ज्ञानेश्वर श्रीधर बऱ्हाटे, दिनकर सिताराम पाटील, नितिन काशिनाथ महाजन, सुभाष गेंदा साळुंके यांनी या बैठकीत भाग घेतला.

बैठकीत तालुक्यातील विविध गावातील विधवा निराधार, वृद्धपकाळ, श्रावणबाळ आदी विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकरीता मान्यता देण्यात आली.

वैठकीत समिती अध्यक्ष शेखर पाटील यांनी महसुल प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी समितीच्या कार्यालयातील काही अधिकारी हे सदस्यांशी व आपल्या कामासाठी येणाऱ्या निराधार, वयोवृद्ध व्यक्ती तसेच त्यांच्या नातेवाईकांशी व नागरीकांशी अतिशय बेजबादारपणाची वागणूक देऊन उडवा उडवीची उत्तरे देत असल्याच्या तक्रारी येत असल्याने यावेळी पाटील त्यांनी बैठकीत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

समितीच्या वतीने त्याचप्रमाणे काही बाहेरील दलालांच्या व कार्यालयीन कर्मचारी यांच्या माध्यमातून संगनमताने आर्थिक देवाण घेवाण करून समाविष्ठ असलेल्या प्रस्तावांना मात्र समितीच्या वतीने नाकारण्यात आले. सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी समितीद्वारे घेण्यात येत असलेल्या अतिशय महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी जर कार्यालयीन अधिकाऱ्यांना वेळ नसेल तर हा प्रश्न आम्हाला वरिष्ठापर्यंत पहोचवावा लागेल असा इशाराही शेखर पाटील यांनी बोलतांना दिला.

Protected Content