जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, या रागातून लोखंडी कोयत्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात संगीता रमेश झेंडे आणि तिचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हे दोघेजण वास्तव्याला आहे. दरम्यान 11 मे रोजी दुपारी दीड वाजता रमेश झेंडे यांनी पत्नी संगीता यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. ते पैसे दिल न दिल्याच्या कारणावरून पती रमेश झेंडे यांनी पत्नी संगीता यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयताने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर संगीता झेंडे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पती रमेश बाबासाहेब झेंडे यांच्या विरोधात रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहे.