किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत एकावर ब्लेडने वार !


धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील भोकणी गावात किरकोळ कारणावरून लग्नाच्या बस्त्यात आलेल्या एकावर दारू पिऊन ब्लेडने वार करून दुखापत केल्याची घटना रविवारी घडली आहे. या संदर्भात रात्री अकरा वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील भोकणी गावांमध्ये रविवार ११ मे रोजी सायंकाळी सहा वाजता दिगंबर रघुनाथ मोरे यांचा मुलीचा लग्नाचा बस्त्याचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी संशयित आरोपी समाधान सिताराम वाघ याने किरकोळ कारणावरून दारू पिऊन आधार भील याला शिवीगाळ करून त्याच्या खिशातून ब्लेडने वार करून आधार भील याच्या कानावर ब्लेडने वार करून जखमी केली आहे. दरम्यान या घटनेबाबत संजय भिल यांचे नातेवाईक रेखा संजय भिल यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता संशयित आरोपी समाधान सिताराम वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील लोहार करीत आहे.