पतीला मारहाण अन् पत्नीला शिवीगाळ; एकावर गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । घराच्या बांधकाम करण्याच्या वादातून एकाला विट फेकून मारहाण तर त्याच्या पत्नीला शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील चिंचखेड सिम येथे घडली. याप्रकरणी एकावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, योगेश सुपडू सोनवणे (वय-३१) रा. चिंचखेड सीम ता. बोदवड हे आपल्या पत्नीसह राहातात. शेतीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. योगेशच्या घराचे बांधकाम सुरू आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घराचे बांधकाम सुरू असतांना त्यांच्या शेजारी राहणारे ज्ञानेश्वर उर्फ जीवन उखर्डू सोनवणे रा. चिंचखेडा ता. बोदवड याने बांधकामाच्या कारणावरून वाद घालता. यात शाब्दिक चकमक झाल्याने ज्ञानेश्वरने योगेशला विट मारून फेकली त्यात योगेश जखमी झाला तर योगेशच्या पत्नीला शिवीगाळ केली. याप्रकरणी योगेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहे. 

Protected Content