उद्या मोदींच्या हस्ते ४ लाख बचत गटांना १६२५ कोटीचे वाटप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी उद्या ४ लाख बचत गटांना १६२५ कोटी रुपयांच्या कॅपिटलायझेशन सपोर्ट फंडचे वाटप व महिला बचत गटातील साडेसात हजार सदस्यांना सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना अंतर्गत २५ कोटी रुपये हस्तांतरीत करतील. ७५ शेतकरी उत्पादक संस्थांना निधी म्हणून ४.१३ कोटी रुपये देणार आहेत.

 

पंतप्रधान मोदी १२ ऑगस्टला देशातील आत्मनिर्भर महिलांशी संवाद साधणार आहेत. दीनदयाल अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनअंतर्गत बढती मिळालेल्या महिला बचत गट आणि त्यातील सदस्यांशी ते दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. कार्यक्रमादरम्यान, देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथांचा संग्रह, शेतीच्या उपजीविकेचे सार्वत्रिकीकरण करण्यावरील हँडबुकचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन केले जाईल.

 

दीनदयाल अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना टप्प्याटप्प्याने स्वयंसहाय्यता गटांमध्ये  एकत्र करणे आणि त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी, त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दीर्घकालीन सहाय्य प्रदान करणे हा आहे.

 

Protected Content