हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

मुंबई ।  महाराष्ट्रातील हॉटेल्स,  बार आणि रेस्तराँ रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता हॉटेल्सही सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. करोनाची परिस्थिती पाहून तेथील यंत्रणांना या निर्णयात बदल करता येईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहनही सरकारने केलं आहे.

राज्यातील बार आणि रेस्तराँ यांच्याबाबतीत राज्य सरकारने नुकताच असाच निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता हॉटेल्सबाबतही हाच निर्णय घेण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.