एमपीएसी परीक्षा घेतल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील – संभाजीराजे

नवी मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही. कारण ही परीक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असाही इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ठाकरे सरकारने फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. राज्य सरकार हातात असणाऱ्या गोष्टीही का करत नाही? मराठा समाजाला सरकारने फसवलं आहे. सारथी ही संस्थाही सरकारने बुडीत खाती घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? असे संभाजी राजे यांनी विचारले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही. कारण ही परीक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असाही इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

राज्य सरकार ऐकत नसेल तर मराठा समाज एमपीएसीची केंद्रं बंद करेल असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाजातील वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद करणार नाही मात्र मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.