Home क्राईम पूर्ववैमनस्यातून हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला ; मारेकरी फरार !

पूर्ववैमनस्यातून हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला ; मारेकरी फरार !


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाची कुरापत काढून एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील उत्तम टॉवर बिल्डिंगसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली आहे. या हल्ल्यात प्रफुल्ल बापुसाहेब देशमुख (वय ३४, रा. उत्तम टॉवर, चाळीसगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल देशमुख हे हॉटेल ब्रिज कॉर्नर चालवून आपले पोट भरतात. १८ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावर उभे होते. दरम्यान, पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून हर्षल दीपक राठोड (रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) हा त्याच्या एका अनोळखी साथीदारासह ॲक्टिव्हा स्कूटरवरून त्या ठिकाणी आला. त्यांनी जुन्या भांडणावरून वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यावर हर्षल राठोड याने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने प्रफुल्ल यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रफुल्ल यांच्या उजव्या दंडावर, उजव्या खांद्यावर, पाठीवर आणि डाव्या हाताच्या बोटांवर गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतही दोघांनी त्यांना शिवीगाळ केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound