टोळीच्या सरपंचपदी हिलाल चव्हाण.

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील टोळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी हिलाल जयराम चव्हाण यांची तर उपसरपंच पदी सुशीलाबाई संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तत्कालीन सरपंच प्रतिभा शरद पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा कार्यालयात झाली. मंडल अधिकारी एन.आर.महाले अध्यक्षस्थानी होते. सरपंच पदासाठी हिलाल चव्हाण तर उपसरपंच पदासाठी सुशीलाबाई पवार यांचे एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एन.आर.महाले यांनी काम पहिले. त्यांना तलाठी भरत पारधी,ग्रामसेविका श्रीमती जे.एल.शेलार,ज्ञानेश्‍वर पाटील,मोहन पाटील,नाना मराठे यांनी सहकार्य केले.

सभेस माजी सरपंच प्रतिभा पाटील,संगीता पाटील,कल्याणी मराठे,नरेंद्र पाटील,गोकुळ मराठे,शरद पाटील,प्रकाश मोरे,गीतेश मराठे,दशरथ चव्हाण,भगवान चव्हाण,संजय पवार,विजय चव्हाण यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाच्या ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातुन गावातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरपंच हिलाल चव्हाण यांनी सांगितले.स्वच्छ गांव सुंदर गांव हि संकल्पना ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टोळी (ता.एरंडोल) येथील नवनिर्वाचित सरपंच हिलाल चव्हाण यांचा सत्कार करतांना शरद पाटील त्यांचे सोबत ग्रामसेविका श्रीमती जे.एल.शेलार व मंडल अधिकारी एन.आर.महाले.

Add Comment

Protected Content