सुषमा अंधारेंना घेऊन जाणारे हेलीकॉप्टर कोसळले : अंधारे सुखरूप

महाड-वृत्तसंस्था | शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये घडली असून यात त्या बचावल्या आहेत.

या संदर्भात टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आज महाडमध्ये सकाळी हेलीकॉप्टर कोसळले. सदर हेलीकॉप्टर हे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेऊन जाण्यासाठी आले होते. सुदैवाने यात त्यांना कोणतीही इजा झालेली नसून त्या सुखरूप आहेत. तसेच या हेलीकॉप्टरचा पायलट देखील सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात सुषमा अंधारे यांनी वृत्तवाहिनीला माहिती दिली. त्या म्हणाल्या की, मला घेऊन जाण्यासाठी आलेले हेलीकॉप्टर हे उतरतांना क्रॅश झाले. मी यात बसलेली नव्हती. मात्र हे माझ्यासमोरच खाली कोसळले. यातील पायलट हा सुरक्षित असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

Protected Content