अखेर बेस्ट कर्मचार्‍यांचा संप मागे

मुंबई प्रतिनिधी । गत नऊ दिवसांपासून सुरू असणारा बेस्ट कर्मचार्‍यांचा संप अखेर मिटला असून यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेला संप प्रदीर्घ काळापर्यंत सुरू राहिल्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही संपकरी मागे हटण्यासाठी तयार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गतिरोध निर्माण झाला होता. अखेर आज वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अंतिम तडजोडीसाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी २०१९ पासून कामगारांना १० टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कर्मचार्‍यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून थोड्या वेळाने याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

Add Comment

Protected Content